दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे
दौंड -ता.14 बोरीपार्धी,ता.दौंड येथील शेतकऱ्यांचा काल वीज पडून मृत्यू. काल दुपारी 4ते.4.30दरम्यान जोरदार पाऊस पडत असताना वीज पडून संजय जगन्नाथ जगताप या शेतकऱ्यांचा शेताच्या कडेला उभे असताना मुत्यु झाला .जगताप यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, गावांमध्ये सुध्दा हळहाळ व्यक्त करण्यात आली यांच्या मागे पत्नी,एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळल आहे.
तसेच बोरीपार्धी येथे दोन दिवसांपूर्वी सुध्दा अशीच काहीशी घटना घडली असती पण सुदैवाने यामध्ये दोन व्यक्ती ना फक्त भाजले आहे त्यामुळे कोणतीही मुत्यु हानी पोहोचली नाही. तरी नागरिकांनी पाऊस पडत असताना वीजा चमकत असताना शेतातील कामे आहे तशीच ठेवून झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Social Plugin