मालेगाव प्रतिनिधी):-जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : जागतिक तंबाखू नकार दिन ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे साजरा करण्यात आला."आकर्षणाचा मुखवटा उतरवूयाः तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करूया" हे घोषवाक्य घेऊन
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे आज दिनांक 31/05/2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे तसेच ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुहास वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.अबोली अहाळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम या विषयी NCD समुपदेशक प्रवीण गोरे यांनी मार्गदर्शन करताना तोंडाचा कर्करोग त्याची काही लक्षणे ती पुढील प्रमाणे
सतत 15 दिवस पर्यंत तोंडातले येणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडाच्या आतील भागात पांढरा ,लालसर रंगाचा व्रण , खडबडीत भाग, आवाजात बदल घोगरा आवाज येणे, तोंडामध्ये 3 किंवा 2 बोट उभे टाकली असता न जाणे, इत्यादी लक्षणे दिसून आल्यास ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे NCD विभाग मध्ये आपली मुखाचा कर्करोग तपासणी करण्यास सांगितले व ही तपासणी अगदी मोफत करण्यात येते, तसेच मधुमेह उच्च रक्तदाब तपासणी पण केली जाते या दिनाच्या निमित्ताने सर्व रुग्णांनी तंबाखू मुक्त शपथ घेतली व कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यास सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin