मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
राजुरा - येथील आशा स्वंय सेविका वंदना हिवराळे यांनी सामाजिक क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन ३१ मे रोजी सन्मानित करण्यात आले
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना जयंती दिनी ३१ मे रोजी सन्मान पुरस्कार देण्याची योजना शासन स्तरावर महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्याचे शासनाचे निर्देश होते त्या नुसार वंदना हिवराळे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेत राजुरा ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सरपंच अजीतराव राजुरकर,ग्राम विकास अधिकारी अजीत बुरे,प्रकाश बोरजे, अलीयारखाॅ पठाण, विश्वनाथ टोंचर,मारोती टोंचर,किसन मोहळे,आशा सेविका रेखा सोनोने, महिला बचत गटच्या सहयोगीनी वनीता घुगे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष वानखेडे, ज्ञानेश्वर गोरे, महादेव दराडे, यांच्या सह बहुसंख्य महिलां पुरुषांची उपस्थिती होती
Social Plugin