काळजेश्वर येथील मतिमंद तरुणीचे हत्याप्रकरण
डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी.
काजळेश्वर येथील मतीमंद तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात कारंजा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (दि. 3) रोजी अटक करण्यात आली. अरबाज अली वल्द असलम अली (22, रा. काजी प्लॉट, कामरगाव ता. कारंजा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणातील मृत तरुणीची ओळख पटली असून माया अनेश कोडापे (20, रा. काजळेश्वर) असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी (दि. 30) काजळेश्वर येथील उमा नदीच्या पात्रात एक महिला नग्न अवस्थेत पडल्याची माहिती काजळेश्वर येथील सरपंचांनी दिली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे व चमूने त्वरित घटनास्थळ गाठून पाहणी केली असता नदीपात्रातील महिलेचे तोंड पूर्णपणे ठेसल्याचे आढळून आले होते. तिच्या चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या गंभीर जखमा दिसत होत्या. त्यानंतर सदर अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अशातही पोलिसांनी तिचा सुगावा लावला. त्यानंतर माया अनेश कोडापे (20, रा. काजळेश्वर) असे मृत तरुणीचे नाव असल्याचे निष्पन्न करण्यात आले.
ती मतीमंद असून भिक मागत होती, असे तिच्या बहिणीने सांगितले. मायाचा अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी शारदा शंकर धुर्वे (35, रा. काजळेश्वर) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यातील घटनास्थळ काजळेश्वर गावापासून अंदाजे 2 किमी अंतरावरील उमा नदीच्या पुलाखालील पात्रातील असून त्याठिकाणी कोणतीही वस्ती किंवा गाव नसुन या ठिकाणी ही घटना घडली पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.
.jpg)




Social Plugin