Ticker

6/recent/ticker-posts

राजधानी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन


 

भवाडा प्रतिनिधी, पी के गावित

     सुरगाणा तालुक्यात, स्वदेश फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली राजधानी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन करण्यात आले. ते उद्घाटन स्वदेश फाउंडेशनचे जूनियर आणि सीनियर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे खनिजदार भास्कर अलबाड प्रस्तावना सांगितली. तर अध्यक्ष पांडुरंग धूम यांनी कंपनीचा उद्देश कार्य आणि हेतू यावर मार्गदर्शन केले.

             समारोप रंजना ताई चौधरी यांनी केले. कं. अध्यक्ष पांडुरंग धूम यांनी असे सांगितले की, शेतकऱ्यांना व्यापारी वर्ग आहे. तो मोठ्या प्रमाणावर कमी भावात भाजी पाला घेत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. आणि उन्हात काम करून पाहिजे  तेवढा भाव भाजीपाल्याला भेटत नाही. म्हणून शेतकऱ्यांची हक्काची कंपनी म्हणजे राजधानी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. असे अध्यक्षांनी भावना व्यक्त केली. 

                 कंपनीची संचालक मा. संजय गावित, भागवत पवार, कृष्णा बोरसे, पुष्पराज गावीत, देविदास धूम, हिरामण भोये, कैलास जाधव. यांनी शेतकऱ्यांविषयी भावना व्यक्त केल्या.