Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव येथील इसम बेपत्ता पोलीस प्रशासनाकडून शोध पत्रिका जाहीर



 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव- शहरातील इस्तेहार खान गफार खान ऊर्फ राजू (वय ४०) हे दि. १३ जून रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे मालेगाव येथील वेडिंगच्या दुकानात कामासाठी घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.

त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ इमरान खान यांनी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दिल्यानंतर पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. बेपत्ता इस्तेहार खान यांची उंची सुमारे ५ फूट ४ इंच असून शरीरयष्टी सडपातळ आहे. रंग काळासावळा, चेहरा लांबट असून डोळे मध्यम व केस काळे आहेत. त्यांनी हरवण्याच्या दिवशी अंगावर चंदेरी रंगाची अर्धी बाह्यांची टी-शर्ट, व निळी पँट व पायात साध्या चपला परिधान केल्या होत्या. ते हिंदी व मराठी भाषेत संवाद साधतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. इस्तेहार खान यांचे बेपत्ता होणे हे कुटुंबीयांसाठी अत्यंत चिंतेचा विषय झाले असून, त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नसल्याने मालेगाव पोलीसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. कोणीही त्यांना पाहिले असल्यास तातडीने खालील संपर्क क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षकांकडून करण्यात आले आहेः सदर प्रकाराची नोंद पोलीस स्टेशन मालेगाव येथे मिसिंग क्रमांक ३४/२०२५ अंतर्गत करण्यात आली

संपर्कः

पोलीस निरीक्षक संजय चौधरी - ८८८८७६८२१८ स.पो.नि. सागर इंगळे ९९२२४४१२६२ पो.ह. किशोर चिंचोळकर ९०११४४०९९९ पोलीस स्टेशन मालेगाव - ०७२५४-२७१२५३असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.