यावल प्रतिनिधी( रविंद्र आढळे)
दिनांक 12/6 रोजी वारा मुसळधार पाऊस पडला होता त्यात रस्त्यावर अनेक झाले व काही झाडांच्या फ़ांद्या तुटून पडल्या होत्या त्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या हद्दीत असलेला रस्ता डोंगर कठोरा फाटा ते डोंगर कठोरा गाव या रोडवर अवैधरित्या झाडांची कत्तल केली जात असून या तोड करण्यासाठी कुठलीही परवानगी नाही किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी सुद्धा घेतलेली नाही या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल येथे शासकीय भरणा केलेला नाही यात परिसरामध्ये वन विभागाचे वनपाल रवी तायडे म्हणून कार्यरत आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांना हा प्रकार माहीतच नाही असे त्यांनी सांगितले.
एवढी मोठी झाड तोड होत असताना वन विभागाचे कर्मचारी डोळेझाक करून गप्प का बसले असल्याबद्दल सर्व जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे हिरव्या झाडांची अवैध कत्तल होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल व यावल वनविभाग यावल पूर्व पूर्व वनविभागाचे कर्मचारी या रस्त्याने नेहमी वापरत असताना यांना ही अवैध झाडांची कत्तल दिसून येत नाही का अशा अवैध झाडांच्या कत्तली ने वेळेवर पाऊस पाणी होत नसून कुठलीही कार्यवाही वनविभाग का करत नाही याकडे जनतेचे लक्ष लागून आहे
होत असलेल्या अवैध झाड तोडी वर तात्काळ कार्यवाही करून झाड तोड करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जनते कडून मागणी होत आहे
Social Plugin