मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
येथील रेस्ट हाऊस वर दिनांक 13 जून रोजी दुपारी झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या सदस्य भावना गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यासोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यामध्ये शिवसेना पक्ष प्रवेश, तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात, नगरपंचायत निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती च्या येणाऱ्या निवडणुकी लढवणाऱ्या इच्छुक उमेदवार सोबत चर्चा करण्यात आली यानंतर मालेगाव येथे विविध कामाचे भूमिपूजन घेण्यात आले कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख माधव ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर महिला जिल्हाप्रमुख रिसोड संपर्कप्रमुख प्रदीप कुटे उपजिल्हाप्रमुख मंगेश महाराज घुगे प्रदीप मोरे ऋषिकेश सारसकर गजानन केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गोदमले माणिक गालट अनिल जाधव सांगळे घुगे बळी यांच्यासह तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin