Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विजयकुमार पिसाळ यांची बिनविरोध निवड



  बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] .

राष्ट्रभाषानुरागी शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था राष्ट्रभाषा भवन,संभाजीनगर साताराच्या चेअरमनपदी खंडाळ्याचे विजयकुमार पिसाळ,व्हा.चेअरमनपदी पाटणचे नवनाथ कदम तर सेक्रेटरी पदी साताराचे सागर पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. 

     ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेचे संस्थापक ता. का. सूर्यवंशी,आर.वाय.जाधव,संजय पोतेकर,शाहनवाज मुजावर,इकबाल मुल्ला,शिवाजीराव खामकर, माजी चेअरमन ह. रा. सूर्यवंशी, कुमार सोनवलकर,विजय यादव,यांच्यासह शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र बर्गे, सुधाकर माने, कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक ता. का. सूर्यवंशी यांनी या संस्थेवरील सभासदांचा वाढता विश्वास व चढत्या आलेखाबाबत माहिती विशद केली.

       आर.वाय.जाधव म्हणाले, राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेची प्रगती वाखाणण्याजोगी असून ता.का. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीपथावर कार्यरत आहे. यावेळी माजी चेअरमन ह. रा. सूर्यवंशी,कुमार सोनवलकर विजय यादव,संजय पोतेकर  यांनी मनोगत व्यक्त केले.

   नवनिर्वाचित चेअरमन विजयकुमार पिसाळ म्हणाले,संस्थापक व सभासदांनी विश्वासाने आपणावर सोपवलेली जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडून  मिळालेल्या संधीचं सोनं करत संस्था राज्यस्तरावर नावारुपास आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. व्हा.चेअरमन नवनाथ कदम, सेक्रेटरी सागर पाटील यांनीही संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची प्रगती अबाधित ठेवू अशी ग्वाही दिली. रवींद्रकुमार सानप यांनी आभार मानले.