Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर दे. मही मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा


प्रतिनिधी @ समाधान भुतेकर ईसरूळ 

23 जून 2025 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून सहकार विद्या मंदिर दे.मही येथे साजरा करण्यात आला सर्वप्रथम ऑलिम्पिक विषयीचा इतिहास त्याची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगून खेळाविषयीचे सखोल व संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्यानिमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये धावण्याच्या स्पर्धा ,लांब उडी उंच उडी ,गोळाफेक ,थाळीफेक भालाफेक इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये सांघीक स्पर्धांमध्ये खो खो ,कबड्डी ,हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन खरात सर उपमुख्याध्यापक रोहित प-हाड सर पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले क्रीडा शिक्षक संतोष गुमलाडू सर व अशोक चेके सर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडल्या