
प्रतिनिधी- दयानंद कांबळे
बस्तवडे (ता कागल) येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच साताप्पा कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल जिल्ह्याचे माजी खास. संजयदादा मंडलिक यांनी मंडलिक कुटुंबांच्या वतीने त्यांना घरी बोलावून सत्कार केला.
यावेळी लोकनेते माजी खास. स्मृतीशेष सदाशिवराव मंडलिक याचा निवासस्थानी जाऊन साताप्पा कांबळे यांनी महाराष्ट्र शासना कडून मिळालेला पुरस्कार सन्मान चिन्ह, फेटा, गौरव पत्र , अभिनंदन पत्र , शाल, फेटा, व पेन स्मृतीशेष सदाशिवराव मंडलिक यांच्या चरणी अर्पण करून यांना अभिवादन केले.
यावेळी मंडलिक कुटुंबांच्या वतीने माजी खास. संजयदादा मंडलिक व युवा नेते अॅड विरेंद्र मंडलिक यांनी साताप्पा कांबळे यांचा शाल, बुके व पेढे भरवून सत्कार केला
यावेळी माजी जि.प.सदस्य हिंदुराव कांबळे, बस्तवडे गावचे प्रमुख कार्यकर्ते श्री प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते बी. के. कांबळे ( सावर्डेकर ) , मा. नगरसेवक दिलीप कांबळे, सुरुपली गावचे लोकनियुक्त सरपंच अनिल कांबळे , सामाजिक कार्यकर्ते नागेश कांबळे, अजय कांबळे नद्यांळकर , आदी मान्यवर उपस्थित होते
Social Plugin