प्रतिनिधी गणेश कदम.
तालुक्यातील अटकळी येथील पिएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या ऊन्हाळी सुट्या संपल्यानंतर 2025-26शैक्षणीक वर्षांचा पहीला दिवस आज 16जुन रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळीत साजरा करण्यात आला . प्रथमतः माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच प्रतिनिधी उत्तम बत्तलवाड यांच्याहस्ते करण्यात आले शाळेत पहील्या वर्गात श्रावणी पंढरी पोलकमवाड या नविन विद्यार्थ्यांनीचा पहीला प्रवेशाची नोंद करण्यात आली व पहीली ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना यावेळी शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते शालेय पुस्तकाचे व ओळखपञाचे वाटप करण्यात आले .
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या सहकाऱ्यांच गावकऱ्यांच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .व पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय शिक्षण समीती अध्यक्ष मारोती पोलकमवाड शिवाजी डोंगरे (सरपंच प्रतिनीधी) उत्तम बत्तलवाड पञकार विलास शेरे राजेश पोलकमवाड पत्रकार दयानंद भद्रे पुरूषोत्तम कुलकर्णी शाळेतीचे मुख्याध्यापक मारताळे, शिक्षक उत्कृष्ट सुत्रसंचलन करनारे सलगरे, चव्हाण, शिक्षीका, मुनेश्वर, मारमवार, इडलवार, खैरगावे,शहाजन,जाधव, सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin