बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव मधील इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
सुरुवातीस इयत्ता चौथी मध्ये विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. "नवीन शैक्षणिक धोरण व आपल्या संस्थेने राबवलेल्या उपक्रमांतून आदर्श विद्यार्थी घडत आहे. नवे विचार शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्यात रुजवावेत. त्यांच्यातील चिकित्सक वृत्ती वाढीस लावावी.तसेच जगाच्या स्पर्धेत आपल्या संस्थेचा विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही. याकरता संस्था सतत प्रयत्नशील राहील,असे आश्वासन उपस्थित पालकांना संस्था अध्यक्ष डॉक्टर श्री सुरेशराव जाधव यांनी दिले.
ह. भ. प. श्री स्वानंद महाराज यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना आपली संस्कृती व संस्कार जपण्याचे आवाहन केले.कार्यक्रमास संस्था सचिव श्री मोहनराव जाधव, विश्वस्त श्री योगेशराव देशमुख, श्री एस. आर. पाटील सर,श्री के.डी. पवार सर, श्री जे. टी. जाधव, श्री बाबा इनामदार गुरुजी,सौ. हेमलता फडतरे,सौ भूपाली जाधव, सौ रुपाली गुरव, श्रीकांत जाधव इ. मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राचार्य श्री डी.एन.गोफणे यांनी स्वागत केले.
श्री मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
Social Plugin