पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा (लाड ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३० मे रोजी भारतीय जनता पक्ष शहरच्या वतीने त्यांच्या जीवनावर आधारित माहिती पत्रकाचे आणि स्टिकरचे वाटप करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य आणि जीवनपटाची माहिती सर्वसामान्य नागरिक,
व्यापारी यांना पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माहितीपत्रक तथा स्टिकर छापण्यात आले असून, त्याचे
कारंजा शहरातील दुकानादुकानात जाऊन वाटप करण्यात आले. या उपक्रमात शहर प्रमुख प्राजक्ता माहितकर, कौस्तुभ डहाके यांच्यासह भाजपच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Social Plugin