Ticker

6/recent/ticker-posts

जनतेला न्याय देण्याचे काम करणार - पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी



 शिवाजी सातव जामखेड 

वाहतूक साठी शिस्त लावली जाईल जेणे करून सुरक्षित व सुरळीत वाटेल. जामखेड महाराष्ट्र न्यूज पत्रकार शिवाजी सातव :- जामखेड पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, सात दिवसांपुर्वी जामखेड चे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला जामखेड मध्ये येताच लक्षात आले की, अनेक समस्या आहेत. या समस्यांचा बारकाईने अभ्यास करत आहे. वाहतूक कोंडी, कलाकेंद्रातील गैरप्रकार, गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध मटका, शाळा कॉलेज परिसरातील रोड रोमिओ अशा अनेक समस्या आहेत. याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. 

यामुळे जामखेड करांना दिलासा मिळाला आहे.नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घातला जाईल तसेच अवैध धंदे बंद करण्यात येतील असे सांगितले होते मात्र जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरूच आहे.मटका पेढीवाले प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका पेढ्या राजरोसपणे चालवत होते. कलाकेंद्रात अनेक गैरप्रकार राजरोसपणे सुरू होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पदभार स्विकारताच अवैध धंदे वाल्यांवर कडक कारवाई ला सुरूवात केली आहे. यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. किती दिवस अवैध धंदे बंद राहातील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


shiva