Ticker

6/recent/ticker-posts

श्री हणमंत पवार यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 जांब ता . खटाव येथील श्री हणमंत शंकर पवार हे सेंट्रल रेल्वे मधून कीमॅन या पदावरून नुकतेच सेवा निवृत्त झाले. संरक्षण दलातून निवृत्त होऊन त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. जवळपास 40 वर्ष त्यांनी प्रामाणिक सेवा केली.

श्री पवार यांचा प्रामाणिकपणा, गावाशी बांधिलकी व कौटुंबिक काळजी या गोष्टी त्यांनी तंतोतंत पाळल्या. मितभाषी, कर्तव्य तत्पर व प्रेमळ असणारे श्री हणमंत पवार यांचा मित्रपरिवार मोठा आहे. विसापूर ता .खटाव येथे  त्यांचे मित्र मंडळ, तसेच जांब ग्रामस्थ, आजी माजी सैनिक व पाहुणे मंडळी यांचे वतीने भव्य अशा सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास नि.ऑन. कॅप्टन श्री बजरंग देवकर, जांब गावचे उपसरपंच श्री ज्ञानेश्वर जाधव,श्री रामचंद्र शिंदे,माजी सरपंच श्री सुखदेव शिंदे, श्री रमेश जाधव, श्री मोहनराव गुरव सर श्री  सुभाष शिंदे या मान्यवरांच्या शुभहस्ते श्री व सौ पवार यांचा मानचिन्ह, शाल,श्रीफळ देऊन  भव्य सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमास श्रीअरविंद (बाळासाहेब) देशमुख श्री विश्वंभर शिंदे, श्री कृष्णात आलेकरी,श्री दिनेश शिर्के, श्री गणेश शिर्के, श्री राक्षे, श्री व सौ  फडतरे गुरुजी, श्री शिवलिंग शिखरे, श्री रविंद्र पवार, श्री विशाल पवार,श्री जयवंत पवार, श्री उत्तम पवार, श्री प्रवीण देवकर, ज्ञानेश्वर शिर्के (स.पो. उपनिरीक्षक)तसेच माजी सैनिक,ग्रामस्थ, नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.रेश्मा पवार,शिवलिंग शिखरे, रविंद्र पवार,श्री ज्ञानेश्वर शिर्के( मुख्याध्यापक),, श्री जालिंदर देवकर आदींनी मनोगते व्यक्त केली सत्कारमूर्ती श्री हणमंत पवार यांनी संयोजन कमिटीने केलेल्या या सेवापूर्ती सत्काराचे विशेष कौतुक करून त्यांची ऋण व्यक्त केले. तसेच इथून पुढे युवकांना मार्गदर्शन व ग्राम व कृषी सेवा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.

 श्री शिवलिंग शिखरे यांनी प्रास्ताविक केले विशाल पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले श्री मोहनराव गुरव सर यांनी सूत्रसंचालन केले रेशमा पवार यांनी सर्वांचे आभार मानले.