बुध दि[प्रकाश राजेघाटगे ]
राजापूर ता . खटाव येथील श्री जानुबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व शांताई ट्रस्ट द्वारे मुलांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले . राजापूर येथे जिल्हा परिषद शाळा, राजापूर येथे दोन्ही संस्थाच्यावतीने देणगीदार, शिक्षक व सर्व गरीब व गरजू विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला विनोद गोडसे गुरूजी, प्रख्यात लेखक तानाजी जगताप, फलटण व अध्यक्ष ज्ञानदेव सरोदे होते.
१ ली ते इयत्ता १५ वी पर्यंत राजापूरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, शाळेची दफ्तरे व खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना अशोक गार्डे यांनी केली तर आभार दिपक घनवट यांनी मानले. कार्यक्रमात सर्व देणगीरारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बळीराम डंगारे, बळीराम सुर्यवंशी, आशिष डंगारे, संतोष लवंगारे, किसन म्हेत्रे, शुभम घनवट, नयेश लोटके, विनोद घनवट, अजित दिडके, विलास जाधव, रणजित दळवी आदि उपस्थित होते. तानाजी जगताप, लेखक व शांताई ट्रस्टचे अध्यक्ष अॅड ज्ञानदेव सरोदे साहेब यांची भाषणे झाली.





Social Plugin