बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
11 वा अंतराष्ट्रीय योग दिन श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये साजरा करण्यात आला . योग प्रशिक्षक हुसेन पठाण सर व विद्यालयातील सेवानिवृत्त कला शिक्षक हेमंत येवले या दोघानी स्वतःहा योग प्रात्यक्षिके करत विद्यार्थांच्या कडून करून घेतले . तसेच योग दिनाचे औचित्य साधून व्यायामाचे महत्त्व , योगचे विविध आसने , आहार व आभ्यास याची सांगड घातुन दैनदिन जीवनात व्यायाम नियमित करून शाररिक प्रकृत्ती तंदुरूस्त ठेवली पाहिजे असे मत श्री येवले सर यांनी योगा ची धडे देताना मार्गदर्शन केले . व्यायामाचे व योगाचे फायदे सांगितले .
विद्यालायाचे प्राचार्य अंकुश भांगरे व पर्यवेक्षक नाना दडस यांनी हेमंत येवले सर व हुसेन पठाण यांनी योग चे आसने विद्यार्थांच्याकडून करून घेतल्या मळे विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळं व पुष्प गुच्छ देऊन स्वागत व आभार मानले . यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षीका , शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी विविध आसने केली . भगवान सरवदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले . व विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .





Social Plugin