Ticker

6/recent/ticker-posts

रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲड. जे. टी. पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी तर सचिवपदी योगेश मगर यांची एकमताने निवड



अलिबाग(रत्नाकर पाटील)

रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था असलेल्या "रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ मर्यादित, अलिबाग" या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुका बुधवार, दिनांक ०४/०६/२०२५ रोजी, सहाय्यक निबंधक डॉ. गायकवाड मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.

या निवडणुकीत ॲड. जे. टी. पाटील (अलिबाग) यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी, श्री. दिलीप जोशी (मुरुड जंजिरा) यांची उपाध्यक्षपदी, तर श्री. योगेश मगर (वेश्वी, अलिबाग) यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. ही त्रिसूत्री निवड महासंघाच्या भविष्यातील कारभारासाठी अनुभव, कार्यक्षमता आणि एकात्मतेचा सुरेख संगम ठरतो आहे.ॲड. जे. टी. पाटील हे २००० पासून सातत्याने संचालक, तर २०१७ पासून अध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात महासंघाने संस्थात्मक बळकटीसोबत भौतिक प्रगतीदेखील केली आहे.

महासंघाचे स्वतःचे कार्यालय – एक ऐतिहासिक टप्पा महासंघाचे कार्यालय स्वतःच्या मालकीच्या जागेत असावे असा निर्णय पूर्वी झाला होता, मात्र निधीअभावी अडचण होती. अध्यक्ष ॲड.जे. टी. पाटील यांच्या पुढाकाराने, ४८ सभासद पतसंस्था यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन, अलिबाग शहरातील मोक्याच्या ठिकाणी भव्य कार्यालय उभारण्यात आले.या ऐतिहासिक कामगिरीमुळे रायगड जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ हा स्वतःच्या मालकीच्या जागेत कार्यालय असलेला राज्यातील केवळ तिसरा महासंघ ठरला आहे.

सचालक मंडळ – बिनविरोध निवड: ॲड. जे. टी. पाटील – अलिबाग ,दिलीप जोशी – मुरुड जंजिरा, योगेश मगर – वेश्वी अलिबाग ,अमित ओझे – पनवेल ,सुनील दामले – अलिबाग ,जगदीश कवळे – श्रीबाग, अलिबाग,ॲड. मिलिंद चव्हाण – श्रीबाग, अलिबाग ,अशोक प्रधान – अलिबाग, दिलीप पटेल – रेवदंडा, गणेश म्हात्रे – धाकटे भोम चिरनेर  ,चंद्रशेखर जोशी – रोहा ,हेमंत पाटील – उरण ,प्रमोद पाटील – अलिबाग ,चंद्रकांत घोसाळकर – पाली, सुधागड ,प्रकाश चांदिवडे – कळंबोली ,ॲड. के. एस. पाटील – नवीन पनवेल ,निजामुद्दीन कागदी – साई, माणगाव ,ॲड. कविता ठाकूर – अलिबाग ,सौ. उषा चांदगावकर – रोहा ,संजय वानखेडे – पिंपळभाट, अलिबाग

नूतन कार्यकारिणीवर सहकार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अध्यक्ष ॲड. पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, "सहकार ही चळवळ आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकीची असून, महासंघाच्या माध्यमातून पतसंस्थांना बळकटी, पारदर्शकता व विश्वासार्हतेचे अधिष्ठान देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे."