बुध दि.6 [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने खटाव तालुक्याच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वर्धनगड या ठिकाणी देशी झाडांच्या वृक्षांचे त्याच्या कुंपणासह दत्त मंदिर परिसर व जुनी स्मशान भूमीत सुंदर व आकर्षक अशा पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यापूर्वी सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने वर्धनगड ते निढळ हा हरित मार्ग करण्यासाठी मोठे पाऊल उचलले, देशी झाडांचे महामार्गाच्या दुतर्फा गेल्या वर्षी लागवड केली, तसेच त्याबरोबर संरक्षण कुंपण व गेल्या त्रिव्र उन्हाळ्यात 41 42°c तापमान असताना टँकरने आठवड्यातून एक वेळ पाणी घालून वृक्षांचे मोठ्या प्रमाणात जतन केले. आणि काल देवस्थान ट्रस्ट व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वर्धनगड दत्त मंदिर परिसरातील काही भागांमध्ये तसेच जुन्या मशानभूमीच्या जागेमध्ये देशी झाडांचे सुंदर व आकर्षक असे वृक्षारोपण करण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्ट ने वृक्षारोपणाचा घेतलेला ध्यास यासाठी जनतेने पाठिंबा द्यावा, व हे वृक्षारोपण जपण्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन रणधीर जाधव यांनी केले. रणधीर जाधव व त्यांचे सर्व सहकारी यांनी वर्धनगड या ठिकाणी आपले अमूल्य वेळ देऊन पूर्ण दिवसभरामध्ये हे वृक्षारोपण केले. यासाठी वर्धनगड येथील जनतेने हे वृक्ष,वृक्षारोपण जोपासण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. यापूर्वी वर्धनगड येथील तरुणांनी या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे वृक्षारोपण केले आहे. देवस्थान ट्रस्ट ने केलेल्या या वृक्षारोपणाला साथीची गरज आहे. या रक्षा रोपणामुळे उद्या हा परिसर उद्यानात रूपांतरित होईल वर्धनगड च्या ऐतिहासिक सुंदरतेत अधिक भर येईल असेही रणधीर जाधव यांनी सुचित केले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Social Plugin