बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
योगासने व योग साधनेने माणसाच्या आरोग्यात व जीवनात अमुलाग्र बदल होतो. याचेच अनुभूती देण्यासाठी कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉक्टर श्री सुहास वारके, कारागृहाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशाने कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून कारागृहातील बंदयांसाठी योगासनांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.योग विद्या धाम, सातारा व योगा शिक्षक संघ, सातारा यांचे वतीने कारागृहातील पुरुष व महिला बंदयांकरीता आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बंदयांचे सर्व प्रकारचे योग घेऊन योगासने घेण्यात आली.
योग दिनासाठी कारागृहातील सर्व महिला व पुरुष बंदयांनी सहभाग घेतला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांचेमार्फत देखील जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता योग विद्या धाम सातारा येथील श्री संपत पवार, श्री मानसिंग गोडसे, श्री संदीप कणसे, श्रीमती शैलजा ठोके, श्रीमती शब्बूफा शेख, श्रीमती शकुंतला जाधव, श्रीमती सोनाली सावंत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अँड. श्री आशिष राठोड यांनी तसेच कारागृहाचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, अति वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, सुभेदार मानसिंग बागल, शिपाई चांद पटेल, संकेत जाधव, ज्ञानेश्वर गायकवाड, संदिप बोराटे, श्रीमती सुनिता बारवकर, गीता दाभाडे, सोनाली थोपटे, रूपाली नलवडे, अश्विनी नाळे, प्रेमनाथ वाडीकर, यशवंत पाटील, तुकाराम घुटुकडे, तानाजी बुडगे यांनी देखील योगासनांमध्ये सहभाग घेतला.





Social Plugin