बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
ग्लोबल कलर ॲन्ड केमिकल लिमीटेड व सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान किल्ले वर्धनगड यांचे वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धनगड येथे मोफत वह्या वाटप व अंगणवाडीच्या मुलांना दप्तर वाटप करण्यात आले.
गेल्या दोन वर्षापासून ग्लोबल कलर अँड केमिकल लिमिटेड व सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांच्या वतीने वर्धनगड व पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळाना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यावर्षीही आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ . प्रियाताई शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रियाताई शिंदे म्हणाल्या, ग्लोबल कलर व सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठान यांचे वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम स्तुत्य असा असून, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत होत आहे. आणि अशा प्रकारचे शालेय साहित्य वाटप इतर सामाजिक संघटना प्रतिष्ठान मंडळे यांच्याकडून होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. या शालेय साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्र शाळा वर्धनगड यांचे प्रांगणात घेण्यात आला. यावेळी
सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठानचे संजय घोरपडे, किशोर खामगळ सरपंच महेश पवार, उमेश चव्हाण, नितीन घोरपडे, संतोष कदम, अक्षय मोहिते सागर पवार मुख्याध्यापक कदम व त्यांचे सर्व शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका शोभा पवार इत्यादी उपस्थित होते.





Social Plugin