Ticker

6/recent/ticker-posts

आधुनिक शेतीविषयी कृषिदूत देणार धडे अंबकमध्ये पदाधिकाऱ्यांकडून स्वागत


 बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

ग्रामीण जागरूकताव औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेठरे बुद्रुकच्या जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे अंबक (ता. कडेगाव) येथे आगमन झाले. अंबकचे सरपंच सुरेश तांबेवाघ , उपसरपंच रोहीत जगदाळे व ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिदूतांचे उत्साहात स्वागतकेले.

सहा महिन्यांच्या अभ्यास दौऱ्यात शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासह शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शन करतील. प्रात्यक्षिकाद्वारे शेती प्रक्रिया उद्योग, अधिक उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतात नवनवीन प्रयोग, फळबाग लागवड याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शेतीत

येणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपक भिलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण पाटील व प्रा.अमोल अडके यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार गोरे, मयूर जाधव, महेश भुसे, मंगेश चव्हाण, अथर्व क्षीरसागर, गणेश पाटील, निरंजन साळुंखे आदी कृषीदूत अभियानात सहभागी झाले आहेत