साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
मेहकर : पांगरखेड येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुकनंदन हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले. छाया सातपुते यांनी विविध आसनांचे सादरीकरण करत उपस्थितांना प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय आखाडे,पदवीधर शिक्षक साहेबराव अंभोरे, सहायक शिक्षक भिमराव सदार , शालेय पोषण आहार तज्ज्ञ विष्णू गांजरे व विद्यार्थी उपस्थित होते
Social Plugin