गणेश सपकाळ अंबड प्रतिनिधी,
हंस फाउंडेशन बहुउद्द्देशीय सेवाभावी संस्थेने 30 अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.हा स्तुत्य उपक्रम मत्स्योदरी विद्यालय, घुंगर्डे हदगाव येथे पार पडला,ज्यामुळे या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.या कार्यक्रमाला हंस फाउंडेशनचे माऊली दोबोले,डॉआत्माराम नाटकर, कारभारी रेवगडे आणि योगेश हेंद्रे हे प्रमुख उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले.
संस्थेतर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.शैक्षणिक उपक्रमात गेल्या दोन वर्षांपासून हंस फाउंडेशन सातत्याने अनाथ आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांना मदतीचा हात देत आहे. संस्थेचे कार्यकर्ते विविध ठिकाणांहून अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलांचा प्रत्यक्ष सर्व्हे करून त्यांची निवड करतात.त्यानंतर त्यांना केवळ शैक्षणिक साहित्यच नव्हे,तर शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या इतर उपयुक्त वस्तूही देऊन पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करतात.या वर्षी संस्थेने एक मोठे उद्दिष्ट ठेवले आहे.वर्षभरात 1000 गरजू,अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे संस्थेने योजिले आहे.
हंस फाउंडेशनचा हा उपक्रम समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे,ज्यामुळे अनेक मुलांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोळुंके सर,मोटे सर,ठाकूर सर,बांगर सर,वाघमारे सर,खराद सर,पवार सर,गुरव सर,कोटंबे सर, पटेकर सर,येटाळे सर,बागवान सर,लाडगे सर, शेख सर,नांद्रे सर तसेच पालक कृष्णा शिंगटे,राजू शिंगटे,भगवान शिंदे आदी पालक उपस्थित *हंस फाउंडेशनतर्फे 30 अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व:एक प्रेरणादायी उपक्रम*





Social Plugin