मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव : आदिशक्ती अभियांतर्गत ग्राम ढोरखेडा येथे ता.३० रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात दंतरोग, ह्दय रोग, नेत्र आजाराबद्दल डॉ,मुखमाले, डॉ.खरात, डॉ लहाने, डॉ पोफळे, डॉ.गिरी, तसेच टेली मानस मानसिक रोगाबद्दल समुपदेशन करण्यात आले.
डॉ.गजानन मिटकरी, डॉ.अनिल लहाने, डॉ.शुभांगी मोहळे, यांच्यासह कर्मचारी गिता देशमुख, प्रविण इंगळे,व सपना साखरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पं.समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडेकर,वि.द.आरोग्य देवकते यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली.शिबिर सरपंच सौ.सुनिता मिटकरी, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बबनराव मिटकरी, निखिल जारे,मोहन वानखेडे, समाधान सावळे, आकाश मिटकरी,बाळू पवार, संजय सावले, गणेश वाळके,गजू सावले, विशाल सावळे,भारत सावले, किरण गव्हाणकर, नारायण चवरे, द्वारका जुंगाडे, ज्योती मिटकरी, संतोष जुंगाडे , आदी गावकऱ्यांनी सहकार्य केले.
Social Plugin