*गावाशेजारीच बिबट्याने केली शिकार गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापूर : सविस्तर माहिती अशी की मलकापूर तालुक्यामधील घिर्णी गावातील अरुण श्रीराम सुशीर यांच्या शेतामध्यील गोठ्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस गाई म्हशी असतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीला जोडधंदा म्हणून गाय आणि म्हशीच्या दुधापासून ते दूध व्यवसाय करतात व आपला उदरनिर्वाह चालवतात काही दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आणि शेतीच्या कामाला जोर आला.
त्याचमुळे अरुण सुशीर हे शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असताना काल रात्री बिबट्याने गायची शिकार करून तिला ठार मारले ही घटना घिर्णी माखनेर रस्त्यापासून जवळच त्यांच्या शेतामध्ये घडली त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला व संपूर्ण परिवारामध्ये दहशतीचे वातावर निर्माण झाले घिर्णी गावातील ही जवळपास तिसरी ते चौथी घटना आहे. गावाच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या या घटने मुळे संपूर्ण गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासन यावरती काय ठोस उपाय योजना करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
Social Plugin