Ticker

6/recent/ticker-posts

एक दिवस तरी वारी अनुभवावी अलिबाग येथे वारी चे आयोजन



अलिबाग(रत्नाकर पाटील)


उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने शनिवार दि ५ जुलै रोजी सकाळी ७.३०वाजताएक दिवस तरी वारी अनुभवावी या साठीअलिबाग येथे वारी चे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय रायगड जिल्हा परिषद,  शिक्षण विभाग, तहसील विभाग, आरोग्य विभाग,  रायगड पोलीस, जिल्हा  न्यायालय, अलिबाग नगरपालिकातसेच अलिबाग तालुक्यातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय, अलिबाग भागवत सप्ताह ग्रुप वरसोली व अलिबाग विठ्ठल मंदिर या सर्वांच्या सहकार्याने अलिबाग विठ्ठल मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वारीची सुरुवात सकाळी ७.३० वाजता होऊन बालाजी मंदिर, ब्राह्मणआळी गणेश मंदिर, राम मंदिर, महावीर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रामनाथ,  वरसोली विठ्ठल मंदिर पर्यंत ही वारी असणार आहे.

 यामध्ये हरिनाम भजन कीर्तन वृक्षारोपण, वृक्ष संगोपन, प्लास्टिक मुक्त भारत, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत ही वारी जाणार आहे.उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून सर्वांनी वारीमध्ये सहभागी होऊन विठुरायाच्या वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.