बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
आज शिक्षणाच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाले असून हे नवे बदल अध्यापन, अध्ययन क्षमता, कौशल्य प्रधान अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात. असे प्रतिपादन जनरल बॉडी सदस्य के .के. घाटगे यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'नवीन शैक्षणिक धोरण आव्हाने आणि संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ.आर .पी भोसले प्रा.डॉ ए.एस.जगताप,प्रा. डॉ .एन.डी.लोखंडे उपस्थित होते.
घाटगे म्हणाले,'उद्योग आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाबरोबर सहानुभूती, आनंदी वृत्ती जागृत होणे हे शिक्षणाचे मुख्य ध्येय असले पाहिजे तसेच वैश्विक नागरिक घडविण्याबरोबर शिक्षणातून सामाजिक बांधिलकीची जपणूक ,औद्योगिक संवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर नीती मूल्यांचा संस्कार होतो. या विषयाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले म्हणाले नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे भारताच्या शिक्षण क्षेत्रात अमलाग्र बदल घडविणारे आहे. विद्यार्थ्यांचा भौतिक, भावनिक सामाजिक आणि व्यावसायिक सर्वांगीण विकास घडविणे ,याबरोबर कौशल्या आधारित शिक्षणावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडता येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा.डॉ. एन.डी.लोखंडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
Social Plugin