Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात संत सावता माळी पुण्यतिथी



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

 मालेगाव ता 24 - मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरामध्ये श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी ता 23 जुलै साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री जगदंबा देवी, श्री सरस्वती देवी, श्री संत गजानन महाराज, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, संत सावता माळी स्व तुळजाराम गाभणे, स्व शाम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

 यावेळी शाळेच्या संचालिका सौ अश्विनी गाभणे ,सौ रोहिणी गाभणे शिक्षिका सौ स्वाती सुरडकर ,सौ नीता भालेराव , ,सुजित अवचार, आकाश गाभणे,सोनाली बेलहारकर, माधुरी राऊत श्वेता जयस्वाल,पुजा शर्मा,अनुपमा भांदुर्गे आदी उपस्थित होते.यावेळी सौं निता भालेराव म्हणाल्या की संत सावतामाळी कर्मयोगी संत होते त्यांनी कर्म करीत असताना श्री विठ्ठल भक्ती केली प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी अरण येथे आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ, राधा काळे यानीपरिश्रम घेतले