दौंड प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे
दौंड -केडगाव ता.दौंड येथील जय मल्हार प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री तुषार दिलीप हाके यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. के. पी. एम. मीडिया आयोजित या पुरस्कार सोहळ्याचा भव्य कार्यक्रम 27 जुलै रोजी पुण्यातील हिंजवडी येथे पार पडला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते श्री. हाके यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*सेंद्रिय शेतीतून यशाचा प्रवास*
तुषार हाके यांनी ऑरगॅनिक शेती, न्यूट्रिशन, हेल्थ अँड कॉस्मेटिक्स, तसेच कृषी कन्सल्टन्सी या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी निर्माण केलेले उत्पादन व सेवा हे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले असून, आज त्यांच्या कंपनीचे कार्य महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांमध्ये पसरलेले आहे. हजारोंच्या संख्येने त्यांचे सशक्त नेटवर्क तयार झाले असून, शेतकऱ्यांसाठी ते एक मार्गदर्शक ठरत आहेत.
*समाजासाठी सकारात्मक योगदान*
केवळ व्यावसायिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही निभावत, तुषार हाके यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विडा उचलला आहे. त्यांच्या कार्यामुळे आज अनेक शेतकरी रासायनिक शेती सोडून पर्यावरणपूरक शेतीकडे वळले आहेत. “रोगमुक्त आणि केमिकल-मुक्त भारत” ही त्यांची ध्येयवाक्य असून, यासाठी ते निरंतर प्रयत्नशील आहेत.
*यापूर्वीचे पुरस्कार आणि गौरव*
तुषार हाके यांना याआधीही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एप्रिल 2025 मध्ये गोवा सरकारकडून त्यांना सरदार पटेल युनिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर मे 2025 मध्ये सनेज कंपनीतर्फे सेंद्रिय कृषी रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
*प्रार्थना बेहेरे यांची स्तुती*
कार्यक्रमादरम्यान प्रार्थना बेहेरे यांनी उद्यमशीलतेचा आदर्श ठेवणाऱ्या तुषार हाके यांचे भरभरून कौतुक केले. “अशा प्रेरणादायी व्यक्तींनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावे व ग्रामीण भागातील तरुणांना उद्योगाकडे वळवावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
*शेतकऱ्यांसाठी विशेष आवाहन*
यावेळी तुषार हाके यांनी बोलताना सांगितले की, “सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्याचा मी प्रयत्न करतोय. शाश्वत शेती ही काळाची गरज आहे.” त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना व ग्राहकांना मदतीसाठी थेट संपर्क करु शकता
Social Plugin