Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त -श्रावण मास शुभारंभ वन औषधी युक्त वृक्षारोपण



प्रतिनिधी--संजय भरदुक मंगरुळपीर 

----- मंगरुळपीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने शिवसेना पक्ष प्रमुख, पर्यावरण प्रेमी श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त "श्रावण मासाच्या शुभपर्वावर,, लोकप्रिय खा. श्री संजय भाऊ देशमुख साहेब यांचे आदेशानुसार मंगरुळपीर तालुक्यात वन औषधीयुक्त, वड, पिंपळ, बेल, पारिजातक, निंब, उंबर, असे विविध प्रकार चे वृक्षारोपण सामाजिकपर्यावरण समतोल राखण्यासाठी कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम म्हणून,, लोकप्रिय खा. संजय भाऊ देशमुख साहेब यांचे कट्टर समर्थक डॉ. सुनील राऊत व उप तालुका प्रमुख भागवतराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूमिका सोहमनाथ पंचवटी महादेव संस्थान मंगरुळपीर, वनोजा येथील भोलेनाथ वृद्धाश्रम, श्री तुळशीराम महाराज संस्थान, हिंदू स्मशानभूमी, श्री नर्मदेश्वर संस्थान येडाशी फाटा, श्री मोरेश्वर संस्थान पिंपरी खुर्द, येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या वन औषधीयुक्त विविध प्रकारच्या वृक्षारोपण कार्यकम प्रसंगी तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, शहर प्रमुख सचिनभाऊ परळीकर, तालुका संघटक बबनराव सावके, युवसेना जिल्हा प्रमुख जुबेरभाई मोहनावले,आरोग्य सेना जिल्हा प्रमुख शिवा सावके, युवासेना तालुका प्रमुख शुभम ठाकरे, धीरज राऊत, प्रा. पवन राऊत, सचिन राऊत, बाळकृष्ण रोकडे, शिवा राऊत, अमोल ठाकरे,श्री तुळशीराम संस्थानाचे गणेश कुरवाडे, रामा भाऊ राऊत, रुपेश म्हातारमारे, सारंगधर ढगे, आकाश काळे, भोलेनाथ वृद्धाश्रमचे मोरेश्वर राऊत, गजानन राऊत, सोहमनाथ पंचवटी संस्थान मंगरुळपीर चे भास्कर भाऊ मुळे व त्यांचे सहकारी, नर्मदेश्वर संस्थान येडासी फाटा येथीलदिलीप पाटील राऊत,डॉ. संजय काळे, सागर राऊत, संजय तिरके, गोवर्धन पाटील तसेच विविध संघटनाचे सर्व वृक्षप्रेमी, समस्त शिवसैनिक तथा तालुका पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते