पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा(लाड )येथील कथित प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी ४० वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी ४ जुलै रोजी दोन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसानाबी सैय्यद युनूस (रा. शाहीन कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे शेख मोबीन शेख वाजीद नामक कथित प्रियकराशी अनैतिक सबंध होते. विशेष म्हणजे त्याने दोघांमधील खाजगी क्षणाची एक व्हिडिओ चित्रफित तयार केली होती आणि त्याद्वारे तो महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. या त्रासाला महिला कंटाळली होती. मात्र कथित प्रियकराने 'माझ्याशी शारीरिक संबंध काय ठेव नाहीतर चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली तर त्याने व त्याच्या लहान भावाने संबंधित महिलेला पोलिसात तक्रार दिली तर जीवाने मारण्याची धमकी दिली होती, अखेर सततच्या या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ४ जुलै रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिलेचा पती सैय्यद युनूस सैय्यद गफुर (४५, रा. शाहीन कॉलनी कारंजा) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कथित प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद (३८) व त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद (३५, दोघेही रा. दाईपुरा कारंजा यांच्याविरुद्ध कलम कलम १०८, ३५१(३), ३५२ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे
पोलिसांनी यातील आरोपीशेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून, दुसरा आरोपी पसार आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक ठाकरे करत आहे
Social Plugin