पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
आषाढी एकादशी चे नैमित साधून पालघर तालुक्यात अनेक शाळा मध्ये शालेय मुलांच्या वारीचे आ योजन केले होते. महाराष्ट्रातील आराध्य दैवत पांडुरंग आषाढी एकादशीला उभ्या महाराष्ट्रातून वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जात असतात त्याचे औचित्य साधून शाळेतील मुलांना वारी आणि पांडुरंग कळवा वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी म्हणून आज पालघर तालुक्यातील प्रत्येक शाळेत , बालवाडीत वारीचे प्रतीकात्मक आयोजन केले गेले . तुळशी डोक्यावर घेऊन साडी चोळी नेसून मुलीनी आनंद घेतला. कोणी पांडुरंग तर कोणी विठाई बनून तर लेझीम ढोल ताशाच्या गजरात वारकरी बनून टाळ वाजवत पदयात्रा केली.
विठ्ठल कळो किंवा न कळो पण महाराष्ट्रची परंपरा जपली जाते हे ही शाळेतील या प्रतीकात्मक पालखी सोहळ्याने दाखवून दिले आहे जनसामान्य आज प्रतिकात्मक वारीला मनापासून दंडवत घालताना दिसत आहेत ह्याची देही ह्याची डोळा पांडुरंग आला माझ्या घरा
Social Plugin