Ticker

6/recent/ticker-posts

गुरु पौर्णिमा निमित्त विशेष लेख!!



                                                    !! गरू हाच मुक्तिदाता !!

प्रतिनिधी --संजय भरदुक मंगरुळपीर 

गुरु हाच मुक्तीचा दाता हे शत प्रतिशत सत्य आहे यांच्या मध्ये काही तनिक मात्र मिथ्या नाही.पण आता खऱ्या गुरुजी ओळख करणे फार कठीण झाले आहे. कारण या भारत देशात गुरुजी संख्या करोडोच्या वर आहे. म्हणून आपल्याला खऱ्या सद्गुरु ची ओळख करणे अति आवश्यक आहे. म्हणून तर कबीर साहेब म्हणतात.

*! गुरु किजै जानिके! पाणी पीजै छानिके!!बिना विचारै गुरु करे! पडे चौर्याशी खानि!!*

मला वाटते खुप वेळा विचार करा खूप चौकशी करा आणि खूप विचार पूर्वक निर्णय घ्या गुरु करण्याचा कारण हा मानव देह खूप मौल्यवान आहे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून व 84 लक्ष योनीतून मुक्त करणारे सतगुरू शिवाय कोणीही सोडवू शकत नाही हे जाणून घ्यावे आणि खऱ्या गुरुची ओळख करून घ्यावी.''गु '' म्हणजे अंधकार आणि ''रु'' म्हणजे प्रकाश अर्थात अज्ञान अंधकारातून जो ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतो तो सद्गुरु जाणा व चार वेद सहा शास्त्रे 18 पुराने आधी सर्व सदग्रंथाचे पूर्ण ज्ञान असणे सद्गुरुला आवश्यक आहे. 

 !सतगुरु के लक्षण कहूं! मधुरे बैन विनोद!!चार वेद षट शास्त्र! कहै अठारा बोध!!

 ही एक पूर्ण सद्गुरु ची ओळख आहे .अशा तऱ्हेने गुरुचा शोध करावा व नरदेहाचे सार्थक करावे यातच आपले कल्याण आहे आणि गुरुने दिलेले ज्ञान व साधना पूजा हे सर्व शिष्यांनी त्याचे पालन करावे. अध्यात्मिक क्षेत्रात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. अनमोल आहे,आराध्य देवता या पेक्षाही गुरूचे स्थान खूप मोलाचे असते खरे तर आपले गुरु आपल्याला आई वडीला पेक्षाही शंभर पटीने आपल्यावर प्रेम करीत असतात.व कधीतरी आपल्याकडून अनावधाने चूक घडल्यास ते आपल्याला प्रेमाने समजावतात.पण जेंव्हा गुरु आपल्यावर रागावतात तसेच कठोर वागतात तेव्हा ते आपल्या होण्यासाठी काही गोष्टी सांगत असतात त्यांच्या कठोर वागण्यात आपल्या विषयी प्रेम व माया दडलेली असते. कबीर साहेब म्हणतात.

*!! गुरु कुम्हार सिख कुंभ हे! गढी गढी काढे खोठ!! अंदर हात सहार दे! बाहर से दे चोट!!*

जसे कुंभार मातीचा कुंभ तयार करतांना माती मधले खडे घोटे काढून ती लोण्यासारखी मऊ करतो व त्या भांड्याच्या आतून हाताने हळुवारपणे तर बाहेरून थो पडण्यात रट्टे मारून मजबूत करून त्या भांड्याला भट्टीत टाकून सलाखून कणखर भांड तयार करतो अशा प्रकारे सद्गुरु आपल्याला तयार करत असतात त्यांचा राग मानू नये गुरुची महिमा सर्व संत व वेद पुराण शास्त्र सर्व सदग्रंथ गाथात,

! सात समुद्र मसि करू! लेखणी करू बनराय!! धरती का कागद करु! गुरू गुण लिखान जाए!! गुरू बडे गोविंन्द से ! मन में देख विचार!!हरी सुमरे सो रहगए!गुरू भजे हुये पार!! तीन लोक नौ खंड मे! गुरु से बडा ना कोई!! करता करै न करि सकै! गुरु करै सो होई!!

वरील काव्यपंक्ती मधून कबीर साहेब गुरूचे महत्व प्रतिपादन करीत आहेत ते म्हणतात सात समुद्राची शाई केली आणि धरतीचा कागद जरी केला तरी सद्गुरू ची महीमा लिहिता येणार नाही व गुरु हे भगवंतांहुनही मोठे असतात आणि ज्यांनी हरीची भक्ती केली ते इथेच राहतात व जो गुरू आज्ञेने साधना व भक्ती करतात ते पार झाले म्हणजेच मोक्ष पदाला गेले.एक वेळेस काय झाले ते पहा सुखदेव ऋषी विष्णू लोकांमध्ये गेले आणि देवदूतांना म्हणाले मला स्वर्गात राहायचे आहे. तेव्हा ते देवदूत म्हणाले हे ऋषीवर तुम्ही ज्ञानी आहात भक्ती युक्त आहा पण तुम्हाला विष्णू लोकांमध्ये राहता येणार नाही. कारण येथे गुरुशिवाय प्रवेश नाही. सुखदेवजी म्हणाले मला विष्णूदेवांशी बोलायचे आहे देवदूत विष्णूजी कडे गेले व सर्व घटनांचे वर्णन केले. विष्णूजी लगेच तिथे गेले व सुखदेवांना म्हणाले ऋषीजी तुम्ही येथे गुरुशिवाय राहू शकत नाही. तुम्ही गुरु धारण करा तेव्हा तुम्हाला येथे राहता येणार आहे. तेव्हा ऋषीजी म्हणाले की हे प्रभू पृथ्वीवर माझी बरोबरी कोणी करू शकत नाही मी कोणाला गुरु करणार सांगा तेव्हा विष्णूजी म्हणाले हे ऋषीजी आपण राजा जनकाला गुरु धारण करा सुखदेवजी तेथून इंद्रलोकात गेले व इंद्रदेवांना म्हणाले की विष्णूजी मला असे म्हणाले इंद्र म्हणाले तुम्ही अजून गुरु धारण केले नाही तुमचे जगणे व्यर्थ आहे तुम्हाला स्वतः भगवान म्हणाले की गुरु धारण करा तुम्ही कसला विचार करत आहा तेव्हा ते ऋषी राजा जनकाच्या राज्यात गेले आणि नाम उपदेश घेतला तेव्हा ते ऋषी विष्णू लोकात राहू शकले.कबीर साहेब म्हणतात.

*!गुरु बिन माला फेरते! गुरू बिन देते दान!! गुरू बिन दोनो निष्फल है! पछो वेद पुराण!! रामकृष्ण से कोन बडा!उन्हो भी गुरू किन्ह!! तीन लोक के वे धनी! गुरू आगे आधीन!!*

 सद्गुरु वाचून केलेले जप दान हे सर्व निष्कल आहे.हे जाणून घ्यावे कारण श्रीराम व कृष्णाने गुरु धारण केले आपण त्यांना देव मानतो प्रभु मानतो ते तीन लोकांचे धनी आहेत.तरी ते गुरु समोर आधीन राहतात आपण तर सर्व साधारण व्यक्ती आहोत याची दक्षता घेतली पाहिजे कारण आपल्याला आपल्या जिवनात गुरु शिवाय मार्ग मिळणे तसेच शांती मिळणे कठीण आहे. जीवन मुक्तीसाठी गुरु कृपेची नितांत आवश्यकता आहे सद्गुरु शिष्याच्या लौकिक कल्याण बरोबरच त्याचे परमार्थिक कल्याण करण्यास पूर्ण समर्थ असतो. पण गुरु हा खरा व सत्यवादी असायला हवा कारण गुरु हे दोन प्रकारचे असतात एक खरे जे खरे ज्ञान देतात व दुसरे खोटे जे खोटे ज्ञान देतात.

*!झुटे गुरू बने अजगर! लाख चौराशी जाय!! शिष्य बने चिटीया! नोच नोच कर खाय!!*

 प्रत्येक मनुष्यमागे गुरु असतो व त्यामुळे त्याचे जीवन चांगले वाईट घडत असते. वाईट गुरु आतंगवादी दहशतवादी नक्षलवादी यांना जन्म देतो.व त्यामुळे सर्व जगाला एक वेगळे भय किंवा दहशत वाटत असते. पुरातन काळात शुक्राचार्य असाच गुरु होता त्याने रावण घडविला तथा अनंत राक्षस घडविले आजही इतिहास त्याचे वाईट दृष्टीने नाव घेत आहे. तरी अशा गुरूच्या आहारी जाऊ नये व आपल्या आयुष्याचे नुकसान करू नये. गुरुदक्षिणा मागताना कोणाचा अंगठा मागू नये. तर बोट धरून पुढे चालवावे कबीर साहेब म्हणतात.

 *!गुरु तो ऐसा चाहिये! शिष्य से कुछ भी नाले !! शिष्य तो ऐसा चाहिये!गुरु को सब कुछ दे!!*

 आपल्या मागे शिष्यांनी परमेश्वराची भक्ती चालू ठेवावी. यापलीकडे शिष्याकडून कोणतीही गुरुदक्षिणा घेऊ नये असे कबीर साहेब सांगतात .तर असा गुरूचा महिमा आहे तरी प्रत्येकाने अनुभव आल्यानंतर आध्यात्मिक गुरु करावा व आपले कल्याण करावे.  

               

(लेखक ,गणेश नारायणराव बोथे ,मु.गोगरी ता .मंगरूळनाथ ,जि.वाशिम.   

लेखक हे छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहेत