Ticker

6/recent/ticker-posts

मानव सेवा हिच ईश्वर सेवा _ डॉ . अभिजीत सोनवणे



बुध दि[प्रकाश राजेघाटगे ]

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे समजून समाजातील लोकानी काम केल्यास निश्चीत समाजामध्ये बदल पहायाला मिळेल असे मत पुणे येथील  डॉ अभिजीत सोनवणे मांडले .               सर्वोदय सामाजिक संस्था, काटेवाटी बुध यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार सोहळा वैज्ञानिक , साहित्य , संशोधन व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य  केलेल्या व्यक्तिना पद्मभूषण डॉ . पां . वा . सुखात्मे समाजभूषण पुरस्कार दिला जातो ह्या वर्षीचा पुरस्कार डॉ . अभिजीत सोनवणे भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर यांना दत्ताजीराव जाधव यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याबद्दल पुरस्कार दिला गेला .                                      

  यावेळी  दत्ताजीराव जाधव ,हेमलता फडतरे,  प्राचार्य अंकुश भांगरे , नाना दडस ,पोपटराव जगताप , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे ,रविराज लाड ,मंगेश नलवडे,प्रतापराव घाडगे ,महेंद्र जगदाळे ,नितीन गाडे उपस्थित होते . या सर्वांचा सत्कार आंब्याचे रोप , पुस्तक देऊन संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी व पदाधिकारी यांनी केले .                                              डॉ . सोनवणे पुढे म्हणाले की , विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी करत असलेल्या जबाबदारीची जाणिव ठेवली पाहिजे . तसेच डॉ . पां . वा . सुखात्मे यांचेसारखे विद्यार्थी तुमच्यातील  बुधमधून आणखी घडले पाहीजे अशी भावना व्यक्त केली . देवीला साडी आर्पण केली जाते परंतु त्या देवीला खरच गरज नाही परंतु समाजात अशा कितीतरी देवी आहेत त्यांना त्या साड्याची गरज आहे . त्यामुळे समजाहिताचे कार्य करणेगरजेचेआहे  .    उपस्थित सर्व मान्यवर यांनी सर्वप्रथम डॉ . पां .वा . सुखात्मे व डॉ . ए .पी .जे .अब्दुलकलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले .विद्यालयातील विद्यार्थिनींनी  संस्था प्रार्थना व स्वागतगीतीनी कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी दत्ताजीराव जाधव यांनी  पद्मश्री डॉ पा वा सुखात्मे यांच्या कार्याचा आढावा घेतला . मुळ बुधचे डॉ .सुखात्मे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ होऊन गेले हा आदर्श विद्यार्थी यांनी घ्यावा असे आव्हान केले . डॉ अविनाश सोनवणे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह , पुस्तके व आंब्याचे रोप देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी डॉ संदिप माळी यांनी सन्मान पत्राचे वाचन केले . तर रिया काटकर हिने डॉ . सोनवणे करत असलेल्या कार्याचा आढावा सांगितला . अध्यक्षीय भाषणात हेमलता मॅडम यांनी डॉ अभिजीत सोनवणे भिकाऱ्याचे जीवनाचे दुतच आहेत . त्यांचे जीवन समृद्ध करत आहेत व त्यांना स्वावलंबनाचे कार्य करत आहे . तसेच विद्यार्थी यांनी प्लॅस्टिक निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी यांनी केले .  सूत्रसंचालन भगवान सरवदे व रिया काटकर यांनी केले तर आभार तानाजी पाटील यांनी मानले . प्रेरणा गीत माऊथ ऑर्गनच्या साह्याने गोपीचंद बोराटे म्हटले व कार्यक्रम उत्साहात साजरा झाला . यावेळी श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मधील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांनी आंब्याचे रोप व पुस्तके देऊन केला .