Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी वळतोय आधुनिकतेकडे



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : शेती दिवसेनदिवस कठीण होतं चाल्ली आहे कष्टकरी मजूर, व्यक्ती मिळत नसल्याने व शेती मालाचा योग्य (भाव) मोबदला मिळत नसल्याने शेती करायची असेल तर पध्दत बदलावी लागेल असे कलगाव येथील शेतकरी फारुक अहेमद यांना लक्षात आल्याने तांत्रिक माहिती घेऊन आधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने खर्च कमी करून महत्वाचे म्हणजे माणसे,मजूरांची कमतरता भरून काढली शेतीत समतोलता साधता येईल.

असे लक्षात आल्याने शेतीतील अंतर मशागतीसाठी पेरणी ते पिक काढणी पर्यंत जास्तीत जास्त कामे लहान ट्रॅक्टर ने करण्यावर भर देत आहे.सोयाबीन, कापूस,तुर पिकातील तण व्यवस्थापनाने साठी खूप मदत होत आहे.खर्च कमी माणसाची गरज नाही वेळेवर होत असल्याने पिकाची (चोट)गरज साधण्यात यश मिळत आहे.ट्रक्टरच्या साह्याने पिकातील तण काढल्याने मजूराची गरज कमी झाली खर्च अल्पावधीत होतं आहे.त्याचे पाहुन इतर शेतकरी ही भाडेतत्त्वावर लावून शेतीतील खर्च कमी करत आहे.घाट्यात गेलेली शेती वाचवीने आता गरजेचे झाले आहे खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक शेतकरी बटाईने किंवा मकत्याने शेती देत आहे.ट्रक्टरच्या साह्याने शेतीची कामे वेळेवर कमी खर्चात होत असल्याने झालेली बचत उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.