प्रतिनिधी जिवन साळवे
सिंदखेड राजा तहसीलदार कार्यालय समोर पीकविमा कंपनीच्या वतीने फसल विमा पाठशाळा प्रचार प्रसिद्धीचे काम सुरू असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसानी पोटी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना पीक विम्याची माहिती देण्यात आली.
प्रधान मंत्री पीकविमा योजना १ जुलै पासून सुरु झाली असून ३१ जुलै पर्यंत चालू राहणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, बँक, तसेच या केंद्र सरकारच्या पोर्टलवर शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषी पीकविमा योजना कंपनीचे सिंदखेडराजा तालुका समन्वयक योगेश मांटे,रवींद्र गोरे गोपाल देशमुख, उमेश घुगे, व शेतकरी यांची उपस्थिती होती.





Social Plugin