Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यातील ऐतिहासिक यश



 वाशिम प्रतिनिधी--- संजय भरदुक 

मंगरूळपीर - स्मार्ट पेरणी स्पर्धेत ३२,३३५ शेतकऱ्यांचा सहभाग, १,३६,२८९ एकर क्षेत्रावर यशस्वी पेरणी! वाशिम जिल्हा कृषी विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या स्मार्ट पेरणी स्पर्धेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, एकाच वेळी एवढ्या मोठ्या क्षेत्रात यशस्वीरीत्या आधुनिक पद्धतीने पेरणी केल्याचा राज्यात विक्रम घडला आहे!

ही अभूतपूर्व कामगिरी शक्य झाली ती केवळ जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीमुळे! त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादनाचा आत्मविश्वास मिळाला. खर्चात ५०% पर्यंत बचत कमी पाणी वापर  उच्च उत्पादकता आणि दर्जा पर्यावरणपूरक पद्धती

हे आहे आधुनिक कृषीच्या दिशेने वाशिम जिल्ह्याचे पुढे टाकलेले एक भक्कम पाऊल! सर्व सहभागी शेतकऱ्यांचे आणि मेहनती कृषी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन! व कृषी विभागाने ठरवले तर चमत्कार घडू शकते हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे..

 जिल्हा कृषी अधीक्षक माननीय आरिफ शाहा व प्रकल्प संचालक श्रीमती अनिसा महाबळे व उपविभागीय कृषी अधिकारी श्री संतोषजी वाळके साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये वाशिम कृषी विभाग हा उंच भरारी घेत आहे