Ticker

6/recent/ticker-posts

नैसर्गिक शेती समूहाची भरारी



प्रतिनिधी वाशिम संजय भरदुक 

दिनांक 19/07/25 (कै.) संजय रोमन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व विकास समिती यांच्या वतीने राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बायोडायनामिक कंपोस्ट स्पर्धा 2024 - 25 चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडला. नैसर्गिक शेती ही केवळ शेती पद्धती नाही ती आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक समृद्धी यांचा संगम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा व शेतीची संस्कृती जपावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा सर्ग विकास संस्था प्रमुख बिनिता शहा तसेच समितीचे संचालक राजेश तिवारी उपस्थित होते. 

यावेळेस जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पुरस्कार वितरण करण्यात आले यामध्ये गट या प्रकारातून रिसोड तालुक्यातील व्याड येथील श्री संतामाय नैसर्गिक शेती शेतकरी गट या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अधिकारी गटातून व्याड येथील सहाय्यक कृषी अधिकारी संदिप सरनाईक यांना प्रथम क्रमांक मिळाला. यावेळेस गटातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीमध्ये वापरत असलेल्या निष्ठांचे नमुने मान्यवरांना दाखवण्यासाठी आणले होते. 

त्यामध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत, अंडेजनित अमिनो ऍसिड, तांदूळ पाणी, स्लरी, सोयाबीन टॉनिक, ह्युमिक ऍसिड, एस नाईन कल्चर, कंपोस्ट खत, व्हर्मीवॉश, गांडूळ खत इत्यादी प्रकारचे नमुने त्यांनी मान्यवरांना दाखवले व त्यांची तयार करण्याची पद्धत सांगितली. अशा प्रकारच्या स्पर्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असल्याबद्दलची भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी नैसर्गिक शेती करत असताना कृषी विभागामार्फत सहायक कृषी अधिकारी संदीप सरनाईक ,संदीप मोरे कार्यालय सहायक ,शंकर शिंदे सर्ग विकास समिती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असे नमूद केले. याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. असे असल्याचे नैसर्गिक शेती कक्ष प्रमुख संदीप मोरे यांनी कळविले