( प्रतिनिधी पत्रकार महेश साखरे )
श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण काळज मधील खंडोबा मंदिर येथे खूप जुन्या परंपरेनुसार चिखल मातीचा बनवलेला नागोबा हा पूजला जातो. आणि गावातील सर्व महिला या मंदिरातील नागोबाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी होत असते यावर्षीही या नागोबाचे पूजन करून गावातील महिलांनी खंडोबा मंदिर मध्ये पारंपारिक खेळ खेळून जसे की फुगड्या, लहान मुली चिमुकल्यांनी पतंग उडवणे,जुन्या पंचमीच्या गाण्यांवर ताल धरणे असे अनेक जुन्या परंपरेचे खेळ खेळत सण साजरा करत. गावातील सर्व महिलांनी व लहान चिमुकल्यांनी पतंग उडवत या नागपंचमी सणाचा आनंद घेतला.
Social Plugin