ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव येथील सौ.मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत गावातील विविध ठिकाणी मंगळवार दि.२९ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले.शाळेतील मुलांनाही वृक्ष संवर्धना बाबतीत जाणीव व्हावी,हा उद्देश सूचित करण्यात आला.
यावेळी शाळेचे सचिव बाळासाहेब पाटील खतगांवकर,खतगांव सरपंच सौ.मल्लाबाई मल्लेश पेटेकर,ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक मारोती पिन्नरवार,उपप्राचार्य रमेश वासरे,पर्यवेक्षक शिवदास मठपती,जिलानी येवतीकर, वट्टमवार,देवणे ,शिंदे,शक्करवार, वळगकर, इंगळे,कदम, शेट्टीवार,प्रतिष्ठित नागरिक गोविंद पाटील, शंकर पाटील, अमृत पाटील, कृउबाचे संचालक संतोष पाटील, श्रीराम पाटील, आनंदा पेटेकर, मल्लेश पेटेकर, प्रकाश बुध्देवार शाळेतील मुले-मुली व गावातील नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
Social Plugin