Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियानांतर्गत दाखले वाटपासाठी विशेष शिबिर


प्रतिनिधी :-. सागर इंगोले 

ग्राम पंचाययत कार्यालय मुकुटबन येथे दी. 28/07/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराज व अभियान अंतर्गत दाखले वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून  आधार कार्ड, जातीचे दाखले, राशन कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड,जॉब कार्ड, घरकुल संबंधित तक्रारी,ग्रामपंचायत विषयी तक्रारी, किसान क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, निराधार योजना संबंधित तक्रारी, तसेच उत्पन्नाचे दाखले याबाबत सर्व प्रकारचे समस्या व सर्व प्रकार चे दाखले या शिबिराच्या माध्यमातून गावितील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व दाखले या कॅम्प च्या माध्यमातून देण्यात आले. 

याबाबत मुकुटबन येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कॅम्प आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय आमदार संजय निलकंठ देराकार साहेब,(आमदार वणी विधानसभा)  रासाने साहेब,तहसीलदार झरी जा. सरपंच सौ. मीनाताई आरमुरवार, (मुकुटबन ग्रा. पं ) पोतरेड्डी बद्दमवार ग्रा. वी. अधिकारी मुकुटबन ग्रा. पं. संतोष भाऊ माहुरे, समीर लेनगुळे, मंगेश पाचभाई, दीपक बरशेट्टीवार पो. पाटील मुकुटबन, समंधित सर्व अधिकारी व गावातील मोठ्या संख्येने नागरिक या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येथे उपस्तित होते