प्रतिनिधी--संजय भरदुक मंगरुळपीरर प्रतिनिधि)
केन्द्र व राज्य सरकार विद्युत क्षेत्राचे करीत असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात व जनतेच्या हिताचा सरकारी उद्योग भांडवलशाही कंपन्याच्या हाती जावू नये यासाठी विज कर्मचारी अधिकारी व अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने 09 जुलै रोजी एक दिवसचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता त्या अनुषंगाने या संपाला वाशिम जिल्ह्यात 90 टक्के प्रतिसाद मिळाला असुन काही ठिकाणी विज यंत्रणा प्रभावित झाली होती. विज उद्योगाचे खाजगीकरण करू नये,विज वितरणाचा समातंर परवाना खाजगी कंपन्यांना देवू नये, स्मार्ट मीटर रद्द करावे, 329 विज उपकेंद्रावर नियमित कर्मचारी नेमण्यात यावेत, सर्व विद्युत कर्मचार्यांना पेंशन योजना लागू करावी,43 हजार कंत्रांटी व आवूट सोर्स कामगारांना नियमित करावे, उपकेंद्रावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी,यासह इतर मागण्यांसाठी हा देशव्यापी संप करण्यात आला.विद्युत भवन,सिव्हील लाईन,वाशिम समोर झालेल्या लाक्षणिक संपामधे एम एस ई बी वर्कर्स फेडरेशनचे सर्कल सचिव कॉ. जी व्ही भारस्कर, सबार्डीनेट इंजिनियर असोशियनचे अध्यक्ष एस एस जयपूरकर, म.रा. स्वाभिमानी विज वर्कर्स युनियनचे सर्कल सचिव आर जी आवटे,तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर लहाने, मागासवर्गीय विज कामगार संघटनचे प्रशांत भगत यांनी संबोधित केले तर कॉ.टि एम गवळी (वरिष्ठ नेते) यांनी मार्गदर्शन केले.
पाऊस सुरुअसतांना सुध्दा संघटनेच्या सभासदांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.या संपाला वाशिम येथील माधवरावजी अंभोरे (अध्यक्ष, जिल्हा पत्रकार संघ) बाबारावजी खडसे (अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,शरद पवार) सुनिलभाऊ मापारी (अध्यक्ष, शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे)कैलास खानजोडे (जिल्हा उपाध्यक्ष) रमेश गोटे (तालुका अध्यक्ष) यांनी संप मंडपास भेट देवून पाठिंबा दर्शविला आणि विज कामगार,विजग्राहक व बळीराजा यांचे सोबत आमचा पक्ष असल्याचे नमुद केले. यावेळी निलेश घुगे,संजय गावंडे,विलास गायकवाड, समाधान राठोड, विनोद क्षीरसागर,व्हि व्ही हेडावू, जि आर साबळे, एस एस गोरे, मंगेश शेगावकर,आर एस भेडेंकर, विनायक मुठाळ, विशाल चव्हाण,के एम कराळे, एम एम मिर्झा,संतोष इंगोले, दिनेश भगत,एम जी मनवर, सिराज खान पठाण,सतिश कोठूळे, मोसिन खान,नितीन बरगट, मोईन खान,दादाराव परांडे, देवानंद झोबांडे,ऊमेश सुर्वे, रुपेश पांडे,अन्वर खान , एम पी देशमुख, राम कुटे, पांडूरंग ठाकरे,संतोष जामनिक सुनिल पाटील एस सी मनवर, रोशन सातंगे,दिपाली इंगळे, रुपाली भगत,अश्विनी इंगोले यांचेसह शेकडोचेवर कामगार , सभासद उपस्थित होते. इन्कलाब जिंदाबाद, संयुक्त कृती समितीचा विजय असो, खाजगीकरण मागे घ्या,हर जोर जुलूम की टक्कर मे,संघर्ष हमारा नारा है, केन्द्र व राज्य सरकारचा निषेध असो आदी घोषणांनी संपकर्त्यांनी परीसर दणानून सोडला होता
Social Plugin