Ticker

6/recent/ticker-posts

दहावीच्या माजी विद्यार्थी बॅच मैत्री कट्टा ग्रुपच्यावतीने ललगुण केंद्रात केलेल्या वह्या वाटप

 


बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ]

श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय डिस्कळ येथील सन 1984-85 दहावीच्या माजी विद्यार्थी बॅच मैत्री कट्टा ग्रुपच्यावतीने ललगुण केंद्रात केलेल्या वह्या वाटपामूळे ललगुण केंद्र समूहातील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले .

श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय डिस्कळ येथील सन 1984-85 दहावीच्या माजी विद्यार्थी बॅच मैत्री कट्टा ग्रुपच्यावतीने ललगुण केंद्र समूहातील जिल्हा परिषदेच्या एकूण १३ गावातील वाडी वस्ती शाळेतील मिळून एकूण ६५० विद्यार्थ्यांना १३० डझन वह्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.वह्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात गुरूवर्य श्री,फडतरे सर  आणि वाघ सर यांचे शुभहस्ते  जिल्हा परिषद शाळा चिंचणी येथून करण्यात आली.

प्रत्येक गावात जाऊन कोणताही गाजावाजा व कुठलीही प्रसिद्धी न घेता अचानक जाऊन ग्रुपच्यावतीने विठ्ठलवाडी, शिंदेवाडी,अनपटवाडी, पांढरवाडी, काळेवाडी,नवलेवाडी,मांजरवाडी, मोळ, डिस्कळ , पसूचामळा व गारवडी यासह वाई तालुक्यातील बोरगाव आश्रम शाळेत जाऊन 15 डझन  वह्या वाटप करण्यात आल्या.वह्या मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर प्रकर्षाने दिसून येत होता .

हा कार्यक्रम यशश्वी होणेसाठी ग्रुपचे प्रमुख श्री. शिवाजी जयवंत निकम, कोअर कमिटी सदस्य श्री. कुंडलिक काटकर, राणू बनसोडे, अविनाश ठोंबरे, संजय घोरपडे , अरविंद  कुंभार, पांडुरंग कर्णे  विठ्ठल जाधव, संजय दीक्षित, अरुण आवळे आणि सुरेश भोसले यांनी विशेष मेहनत घेतल्यामुळे हा कार्यक्रम  यशश्वीपणे उत्साहात पार पडला.

यासाठी श्री,साहेबराव आवळे, सतिश बनसोडे, रामचंद्र चव्हाण, रमेश कर्णे, गणपत डिसले, मानसिंग  सावंत यांनी उपस्थित राहून सहकार्य केले .या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या   समाजसेवेबद्दल पंचक्रोशीतील सर्वच शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय कमिटीने समाधान व्यक्त करून ग्रुपमधील सर्वांना धन्यवाद दिले.

  •  Scanned by Gmail