Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरनेर येथील गरजू विद्यार्थ्यांना समाजभान टीमच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


आज दि.३०/०६/२०२५ रोजी जि.प.प्रा.शा.शिरनेर येथे समाजभान टीमच्या वतीने शैक्षणिक पालकत्व या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना दप्तर,रजिस्टर,वही,पेन,पेन्सिल ई.साहित्य व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर चे वाटप समाजभान टीमचे श्री दादासाहेब थेटे सर, श्री सोपान पाष्टे सर,श्री ज्ञानेश्वर गायके सर, शिरनेर चे सरपंच ऍड.श्री रामेश्वर गायके व जेष्ठ लोकतंत्र सेनानी श्री अप्पासाहेब वैराळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.श्री थेटे सर,श्री पाष्टे सर, श्री गायके सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर सरपंच श्री रामेश्वर गायके यांनी आपल्या मनोगतात सर्व समाजभान टीमचे गावाच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी लोकतंत्र सेनानी श्री अप्पासाहेब वैराळ व छबाबाई गायके यांचा समाजभान टीमच्या वतीने सत्कार करण्यात आला.

समाजातील गरजू,वंचित,उपेक्षित घटकांसाठी समाजभान टीमचे कार्य शब्दात व्यक्त न करण्याईतके मोलाचे आहे.त्यांच्या उपस्थितीने, मार्गदर्शनाने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा व सकारात्मक उर्जा मिळाली.