पालघर (ज्ञानेश चौधरी) ग्रामीण प्रतिनिधी
महावितरण ने कुठली परवानगी न घेता जुने चालू मीटर बदलून नवे मीटर लावले गेले. सफाळे परिसरात लावलेल्यानवीन मीटर नंतर ग्राहकांना भरमसाठ बिल पाठवून दिले गेले.जिथे 2000 बिल येते तिथे 10000 बिल दिले गेले.चौकशी केल्यावर असे समजले की जुने मीटर काढल्यानंतर त्याचे शेवटचे रिडिंग हे सिस्टम मध्ये टाकले गेलेच नाही .तसेच नवीन मीटर चे रिडिंग घेतले गेलेच नाही. तरीही ग्राहकांना सरासरी बिल मागील महिन्याच्या तीन पट बिल लाऊन पाठवून दिले
अचानक इतके बिल आल्याने ग्राहकास मानसिक आणि आर्थिक फटका बसला गेला. बिल कमी करून मिळेल तेव्हा मिळेल परंतु महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी करताना ग्राहकाची दमछाक होत आहेमहावितरण आर्थिक आणि शारीरिक मनस्तापाची भरपाई करणार आहे कायहा सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आहे
Social Plugin