वीसपेक्षा अधिक गंभीर गुन्हे : आठ वर्षांपासून होता फरार
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे . ]
पुसेगाव पोलिस ठाणेसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी दरोडा, घरफोडी, चोरी यासारखे वीसपेक्षा अधिक गंभीर गुन्हे करून सुमारे आठ वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार कोहिनूर झाकीर काळे (रा. मोळ, ता. खटाव) यास पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून चिंचणी ते वाठार जाणारे रोडवर भाडळे घाटात पकडले.
पुसेगाव पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे भविष्यात घडणाऱ्या दरोडा, जबरी चोऱ्या, घरफोड्या, चोऱ्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसणार आहे. पोलिस, अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, सहायक पोलिस फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे, पोलिस हवालदार प्रमोद कदम, योगेश बागल, दादासाहेब देवकुळे, पोलिस कॉन्स्टेबल दऱ्याबा नरळे, अविनाश घाडगे, अक्षय जायकर, शुभम पवार यांनी ही कारवाई केली
Social Plugin