प्रतिनिधी :-सागर इंगोले
झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन येथे आर्या इंटरनॅशनल स्कुल तर्फे "एक पेड माँ के नाम सम्पूर्ण मुकुटबन शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
वन विभाग कार्यालय, पोलीस स्टेशनं, व ग्राम पंचायत येथे वृक्ष लागवड करण्यात आले येथील शहरातील दुकान व्यापारी यांना या वृक्ष लागवड करून त्याची जतन करण्या संदर्भात त्याचे महत्व सांगून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली व व्यापारी बांधवांना वृक्ष रोपटे देण्यात आले.पर्यावरण सौरक्षणासाठी तिन्ही कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी उस्पुर्त सहभाग या रॅलीमध्ये त्यांनी दिला. यावेळी विध्यार्थ्यांनी विविध पर्यावरण विषयक घोषणा दिल्या. वन विभाग, पोलीस स्टेशनं ग्राम पं. कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या स्तुत उपक्रमाचे कौतुक केले. या रॅलीमध्ये मुकुटबन च्या सरपंच सौ. मीनाताई आरमुरवार, ग्राम विकास अधिकारी मा. श्री पोतरेड्डी बद्दमावर वन परीक्षेत्र अधिकारी, वनपाल व वन रक्षक सर्व कार्मचारी,शाळेचे आर्या इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृद्ध या रॅलीमध्ये उपस्तित होते
Social Plugin