Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा – दत्तात्रय पाटील



नाशिक , प्रतिनिधि , अमन शेख , 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्य नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, भाजीपाला व इतर अनेक पिकांचे नुकसान झाले असून पेरणीही झाली नाही व अनेक भागांत शेतमाल सडून गेला असून रस्ते, वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून शासनाने तात्काळ मदतीचे पावले उचलणे आवश्यक आहे.

जर शासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलनाच इशारा दत्तात्रय पाटील यांनी दिला आहे.त्याच प्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीनेही त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले, गोकुळ पिंगळे,शहर अध्यक्ष गजानन शेलार- जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील,पूर्व विधानसभा युवक उपाध्यक्ष सुमित सोनावणे आदींनी दिला आहे .

प्रशासनाकडे केल्या मागण्या पुढील प्रमाणे :


1- नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

2 - तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी.

3 - तात्पुरता मदतनिधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा.

4 - शासकीय कर्ज वसुलीला त्वरित स्थगिती द्यावी.